brand-logo

MS-CIT

नेमके काय आहे MS-CIT मध्ये  ? 

       MSCIT म्हणजे काय ? Full form of MS-CIT 

 उत्तर - MS-CIT Full Form महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी (महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र माहिती तंत्रज्ञान ) (Maharashtra State Certificate in Information Technology) असे आहे. महाराष्ट्र शासनाने कुठल्याही सरकारी नोकरी करिता अनिवार्य केलेला हा कोर्स आहे 

दिशाभूल आणि discount देणाऱ्या अनधिकृत केंद्रापासून सावध रहा 

                           आजच्या जगाला डिजिटल युग म्हटले जाते आज भारत देशाने खूप प्रगती केलेली आहे त्यामुळे आज भारत देश नवीन दिशेने वाटचाल करत आहे. आजच्या काळामध्ये सर्व काही घरबसल्या कॉम्प्युटरच्या सहाय्याने होत आहे. त्यामुळे अशा या डिजिटल युगामध्ये प्रत्येकालाच कम्प्युटर येणे खूप गरजेचे आहे. सध्याच्या काळामध्ये कम्प्युटर शिकणे एक खूप महत्वाची गोष्ट बनली आहे. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याप्रमाणेच कम्प्युटर येणे किंवा कम्प्युटरचा वापर करता येणे ही देखील आजची मूलभूत गरज बनत चालली आहे.

कम्प्युटर शिकणे हे खूप सोपे आहे परंतु कॉम्प्युटर शिकण्यासाठी आपल्याला एक सर्वोत्तम कोर्स जॉईन करावा लागतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने कॉम्प्युटरचे महत्त्व लक्षात घेऊन MS-CIT हा कॉम्प्युटर कोर्स सुरु केला आहे. आयटी संकल्पना शिकण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एम.एस.सी.आय.टी कोर्स शिकणे खूप आवश्यक या आहेत. माहिती संप्रेक्षण तंत्रज्ञानाच्या गुंतागुंतीच्या संकल्पाने शिकवून देणे हे एमएससीआयटी कोर्स चे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणून आजच्या एम.एस.सी.आय.टी  कोर्स बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

MS-CIT अभ्यासक्रमांमध्ये शिकविले जाणारे विषय :

एम एस सी आय टी अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाणारे विषय खालीलप्रमाणे आहेत-

 दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेटचा वापर कसा करावा.
 हार्डवेअर आणि नेटवर्किंग काय आहे याबद्दल माहिती
 ERA (eLearning Revolution for all)
  window 10
  MS word 2013
  MS Excel 2013
  MS PowerPoint 2013
 MS outlook 2013
  MS-CIT Theory (History, Generations, New IT Skills) 


MS-CIT Course मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम :

 Computer Introduction:

कोर्समध्ये सुरुवातीला तुम्हाला कम्प्युटरची ओळख करून दिली जाते. कॉम्प्युटर प्रकारे चालू करावे बंद करावे या संबंधित सर्व माहिती MS-CIT या कोर्समध्ये शिकवली जाते. आपल्यातील काही व्यक्तींना कॉम्प्युटर बद्दल जराही ज्ञान नसते त्यामुळे एम एस सी आय टी कोर्स मध्ये सुरुवातीला कम्प्युटर इंट्रोडक्शन शिकविले जाते.

Windows 10 :

विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टिम आहेत. कम्प्यूटर मध्ये वापरली जाणारी सामान्य ऑपरेशन शिकवली जातात. एम.एस.सी.आय.टी कोर्स मध्ये तुम्हाला विंडोज बद्दल संपूर्ण ज्ञान दिले जाईल. थीम कशी लावायची, Taskbar, Calculator, Notepad, Paint(Mouse Handling), Typing Speed, फाइल आणि फोल्डर व्यवस्थापन आणि विंडोज मीडिया प्लेयर याबद्दल सर्व ज्ञान यामध्ये दिले जाते.

 वर्ड प्रोसेसिंग :

वर्ड प्रोसेसिंग मध्ये बेसिक ऑपरेशन शिकवले जातात. जसे की, हेडर आणि फुटर घालने, डॉक्युमेंट तयार करणे, पेज सेटअप लागू करणे, पीडीएफ तयार करणे आणि एडिट करणे इत्यादी शिकविले जाते.

 स्प्रेड शीट :

स्प्रेडशीट मध्ये डेटा विश्लेषण, वर्कशीट चे आयोजन, मुख्य सारण्या तयार करणे आणि फंक्शन वापरणे इत्यादी शिकवले जाते.

 प्रेझेन्टेशन ग्राफिक्स  :

प्रेझेन्टेशन ग्राफिक्स मध्ये वेगवेगळी प्रेझेन्टेशन्स कशी बनवावी त्याचे फायदे, स्लाईडस काशाल म्हणतात ? प्रेझेन्टेशन्स तयार करून सेमिनार देणे इत्यादी शिकवले जाते.

 21 व्या शतकातील जीवन कौशल्य/ अभ्यास कौशल्य:

नेट बँकिंग, सायबर क्राईम संरक्षण इत्यादी कसे वापरायचे याबद्दल माहिती शिकवली जाते यासोबतच यु ट्यूब, विकिपीडिया यांसारखे प्लॅटफॉर्म चा वापर कसा करावा शिकविले जाते.

एम एस आऊट लुक :

Ms outlook मध्ये नवीन ईमेल खाते कसे तयार करावे त्याचे फायदे Mail, Calendar, Contact, Task ई.  शिकवले जाते.


MS-CIT Course साठी आवश्यक पात्रता: ?

MS-CIT Course शिकणे हे सर्वांसाठीच फायद्याचे आहे आणि ते आज गरजेचे ठरते त्यामुळे एम.एस.सी.आय.टी साठी कोणतीही आवशक्य पात्रता नाही,  साधारणता एम.एस.सी.आय.टी हा कोर्स कोणालाही शिकता येतो.

आठवीत असलेल्या विद्यार्थ्या पासून ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण एम.एस.सी.आय.टी हा कोर्स करण्यासाठी पात्र ठरतात. तसेच अन्य कोर्स प्रमाणे एमएस-सीआयटी हा कोर्स साठी कुठल्याही अटी आणि नियम नाहीत.

 

MS-CIT Course चा कालावधी  MS-CIT हा कोर्स किती महिन्यांमध्ये पूर्ण होतो?

एम एस सी आय टी हा कोर्स साधारणता तीन ते चार महिन्याचा असतो परंतु तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये हा कोर्स लावला आहे आणि तुम्हाला किती वेळे साठी कॉम्प्युटर वापरण्यासाठी देतात त्यावर देखील एम.एस.सी.आय.टी कोर्सचा कालावधी अवलंबून असतो. हा कोर्स साधारणतः तीन महिन्यांमध्ये पूर्ण होतो.

 

MS-CIT कोर्स पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतात?

MS-CIT Course ची फी साधारणता साडेचार हजार (4,500) एवढी आहे .

 

MS-CIT Course कंप्यूटर साठी येणे अनिवार्य आहे का?

नाही , MS-CIT  हा कोर्स मुळातच कम्प्युटर शिकण्यासाठी लावला जातो त्यामुळे एमएससीआयटी कोर्स साठी कम्प्युटर येणे अनिवार्य नाही एम.एस.सी.आय.टी कोर्स मध्ये कंप्यूटर बेसिक फंक्शन पासून ते हाय लेवल फंक्शन पर्यंत सर्व काही शिकविले जाते. तसेच या कोर्ससाठी तुमच्याकडे वैयक्तिक कॉम्प्युटर असणे देखील श्यक नाही.

एम.एस.सी.आय.टी ( MS-CIT ) केल्यायानंतर कोण कोणते जॉब मिळू शकतात ?

आता शासनाने सर्वच पदभरती साठी एम.एस.सी.आय.टी  अनिवार्य केले आहे तसेच एम.एस.सी.आय.टी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी क्षेत्रातील असंख्य नोकर्‍या करण्यासाठी आपण पात्र ठरतो. एम.एस.सी.आय.टी केल्यानंतर तुम्हाला आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते त्यासाठी मुलाखतीची  तयारी करावी लागते , बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब मिळू शकतो, याशिवाय ओसीआर प्रोग्रामर, आयटी सल्लागार, संगणक चालक, डेटा अॅनालीटिक्स, डेटा ऑपरेटर, Attendant, डाटा-एन्ट्री  यासारखे अनेक इतर जोब मिळू शकतात.

 

कॉम्प्युटर शिकल्यानंतर मी पैसे कमवू शकतो का?

कॉम्प्युटर शिकणे हे एक असे स्किल आहे ज्याचा वापर करून तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता. ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी कंप्यूटर येणे अनिवार्य आहे असे कितीतरी व्यक्ती आहेत जे घरघरसून कम्प्युटरच्या सहाय्याने लाखो पैसे कमवितात. Freelancing, Blogging, Vlogging, Digital Marketing, Affiliate Marketing, Youtube, करून तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता. पण त्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागते.

 

FAQ

1. एम एस सी आय टी हा कोर्स कशाबद्दल आहे?

Answer: MS-CIT एक महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत घेतला जाणारा कॉम्प्युटर कोर्स आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे एम.एस.सी.आय.टी हे माहिती तंत्रज्ञान साक्षरता अभ्यासक्रम आहे जो महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी सन 2001 मध्ये सुरू केले.

2. MS-CIT full form काय आहे? तसेच कोर्स चे स्वरूप काय आहे?

Answer: MS-CIT Full Form महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी (Maharashtra State Certificate in Information Technology) असे आहे.

3. MS-CIT कोर्स चा काय उपयोग होतो?

Answer: MS-CIT कोर्स चा  दैनंदिन जीवनात भरपूर उपयोग होतो जसे कि घरचे विजेचे बिल भरणे , कुठलेही रिचार्ज मारणे, आधार कार्ड काढणे, सातबारा काढणे, youtube च्या माध्यमातून कुठलाही पदार्थ कसा बनवायचा हे शिकणे,  ग्रीटिंग कार्ड बनवणे , Resume बनवणे , Typing Speed वाढविणे,  MS-CIT कोर्स मध्ये आपल्याला कम्प्युटरचे संपूर्ण ज्ञान शिकवले जाते. तसेच एम.एस.सी.आय.टी कोर्स केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे नोकरी देखील मिळू शकते.