brand-logo

MS-CIT | KLiC COURSES | CSMS-DEEP | KLiC Diploma | KLiC English | KLiC IT | KLiC Soft Skills | KLiC Digital Freelancing |

News :

KKR team wins the final match of the TATA IPL 2024.
SRH संघ उपविजेता
इयत्ता दहावीचा निकालाची तारीख जाहीर : २७ मे २०२४
Showing posts with label चालू घडामोडी. Show all posts
Showing posts with label चालू घडामोडी. Show all posts

 

संत गजानन महाराज भक्तांसाठी आनंदाची बातमी
 पुन्हा सुरु होणार आनंद सागर 
जय गजानन माऊली ! गण गण गणात बोते !

Anand Sagar Shegaon : आगामी काही महिन्यात आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तशा आशयाचे संदेश देखील समाज माध्यमात फिरताना दिसत आहे. मात्र आता काही महिन्यातच आनंद सागर पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे.
संत गजानन महाराज संस्थानकडून उभारण्यात आलेले आनंद सागर अनेक वर्षापासून बंद आहे. आनंद सागर सुरू होण्याची देशभरातील पर्यटक वाट पाहत आहेत. २००१ साली धार्मिक,आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागरची २०० एकर जमिनीवर निर्मिती करण्यात आली आहे.


राज्यातील मोठ देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकार कडून जमीन घेऊन त्यावर धार्मिक,अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकरवर उभारणी केली होती
आनंद सागरमुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्तव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अजूनही आनंद सागर बंद आहे. आनंद सागर सुरू होणार असल्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. मात्र याबाबत संस्थानने अधिकृत माहिती दिली नाही.

आनंद सागरमुळे शेगाव (Shegaon) हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक व पर्यटन वाढलं होत. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानाने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आनंद सागर हे दीड ते दोन महिन्यात भाविकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन महिन्यात आनंद सागर सुरू होऊ शकत. आता याठिकाणी बंद असलेल्या आनंद सागरला (Anand Sagar) दुरुस्त करून रंग रांगोटी करण्याची तयारी संस्थानाने सुरू केली आहे.

आनंद सागर पाहण्यासाठी भाविक देशभरातून येतात. आनंद सागरमुळे शेगाव शहराला मोठ नावलौकीक मिळाले आहे. त्यामुळे पर्यटकांची येथे मांदियाळी असते.

आनंद सागर उद्यान व ध्यान केंद्र आहे. आनंद सागर श्री संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत. मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.

आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत असतात. पर्यटक आनंद सागर सुरू होण्याची वाट पाहत आहेत. आनंद सागर कधी सुरू होणार, असा प्रश्न देशभरातील भाविक विचारत आहेत.

जय गजानन माऊली ! गण गण गणात बोते !